बॉलिवूड अभिनेता वरूण धवन सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. वरूण आणि त्याची गर्लफ्रेन्ड नताशा दलाल यांचे रोमॅन्टिक नाते कुणापासूनही लपलेले नाहीत. नुकत्याच कळालेल्या एका बातमी नुसार वरूण व नताशा या दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याचे समजतेय.
एका एंटरटेनमेंट वेबसाईटने दिलेल्या माहिती नुसार, वरूण व नताशा यांनी गतवर्षीच म्हणजे 2018 मध्ये गुपचूप साखरपुडा केला. दोघांनी कुटुंबीय आणि मोजक्या मित्रांच्या उपस्थितीत हा साखरपुडा केला. हा सोहळा अतिशय खासगी ठेवण्यात आल्याने केवळ वरूण व नताशाचे कुटुंब आणि 1-2 अतिशय जवळचे मित्र एवढेच लोक या सोहळ्याला उपस्थित होते. मात्र, या बातमीवर वरूण वा त्याच्या कुटुंबाकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.
नुकतेच हे कपल येत्या डिसेंबर महिन्यात लग्न करणार असल्याची बातमी आली होती. या डेस्टिनेशन वेडिंगची तयारी सुरु झाल्याचेही या बातमीत म्हटले गेले होते. अर्थात वरूणने या बातम्या नाकारल्या होत्या. वरूणचे वडील डेव्हिड धवन यांनीही हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले होते.