पारगाव शिंगवे- येथील पारगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला जिल्हा मध्यवर्ती बॅकेचा उत्कृष्ठ काम, नियोजन व व्यवस्थापनाबद्दलचा तालुकास्तरीय पुरस्कार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. 2018-19 या आर्थिक वर्षात शंभर टक्के कर्जवसुली, सभासदांना उत्कृष्ठ सेवा दिल्यामुळे सोसायटीला पुरस्कार देण्यात आला आहे.
पुरस्काराचा स्वीकार सोसायटीचे अध्यक्ष सुरेश दातखिळे, दूध संघाचे संचालक दौलत लोंखडे, सोसायटीचे संचालक जयराम ढोबळे, भागचंद पोंदे, संदीप बढेकर, शिवाजी ढोबळे, जयराम लोंखडे, भाऊसाहेब ढोबळे, नामदेव पुंडे, सचिव बाळासाहेब टाव्हरे, सरपंच बबनराव ढोबळे, निवृत्ती ढोबळे यांनी केला. यावेळी बॅकेचे अध्यक्ष रमेश थोरात, उपाध्यक्षा अर्चना घारे व संचालक उपस्थित होते.