सध्या अक्षयचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड बनवताना दिसून येतो आहे. त्यामुळे सर्वच निर्माते-दिग्दर्शक त्याला आपल्या चित्रपटात घ्यायला उत्सूक असतात. मात्र, आता आपले यश कॅश करण्यासाठी अक्षयने आपली फी वाढवली आहे. आता आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी तो 54 कोटी रुपये फी आकारणार आहे. आत्तापर्यंत तो प्रत्येक चित्रपटासाठी 27 कोटी फी घ्यायचा. त्याच्या फी वाढवण्या मागेही नंबर गेम असल्याचे अनेकांचे म्हणने आहे.
अक्षय 9 हा नंबर त्याच्यासाठी लकी असल्याचे मानतो. त्यामुळे मानधनही तो त्यानुसार घेतो. “राऊडी राठोड’ या चित्रपटासाठी अक्षयने 27 कोटी रूपये (2 + 7=9) फी घेतली होती. तर, आता अक्षयने फी वाढवून 54 कोटी (5 + 4 =9) केली आहे.
नुकतेच अक्षयने जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळवले आहे. फोर्ब्स मॅगझीनने जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर केली. या यादीत स्थान मिळवणारा तो एकमेव बॉलिवूड अभिनेता आहे. बॉलिवूडच्या तिन्ही खानांना मात देत अक्षयने या यादीत 33 वे स्थान मिळवले आहे.