अभिनेत्री राधिका आपटे हिने “द वेडिंग गेस्ट’ चित्रपटातून हॉलिवुडमध्ये डेब्यू केले होते. त्यानंतर आता ती आपल्या आगामी हॉलिवूड चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. “लिबरेट ः अ कॉल टू स्पाई’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचा प्रीमियर एडिनबर्ग चित्रपट महोत्सवात दाखविण्यात आला होता.
लीडिया डीन पिल्चर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात राधिका ही नूर इनाय खान नामक व्यक्तीची भूमिका साकारत आहे. आधारित असलेल्या या भूमिकेबाबत राधिकाने सांगितले की, ही अशी एक भूमिका आहे ज्यात एक शांतिवादी महिला एका युद्धात अडकते. नूर ही ब्रिटनमध्ये जन्मलेल्या आणि रशियात वास्तव्यास असलेली अशी महिला होती जिची आई ही अमेरिकन, तर वडिल हे मुस्लीम भारतीय होते.
दुस-या महायुद्धाच्या प्रसंगी नूर ही ब्रिटिशचे पंतप्रधान विंस्टन चर्चिल यांच्या एका खास पथकाची सदस्या असते. तिला फ्रान्समध्ये जासूसी करण्यासाठी पाठविले जाते. पण तिला फ्रान्समध्ये अटक करण्यात येते. पण ती कोणतीही गुप्त माहिती सांगत नाही. अखेर अटकेतच तिचा मृत्यू होतो आणि मृत्यूसमयी “लिबरेट’ असा ती अखेरचा शब्द उच्चारते. दरम्यान, राधिकाने आणखी एक हॉलिवुड चित्रपट साईन केला असल्याचे समजते.