पिंपळे सौदागर – युवा सेना व युवती सेनेच्या वतीने देण्यात येणाऱ्या गुरु माउली पुरस्कार यावेळी उन्नति सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांना प्रदान करण्यात आला. त्याच बरोबर समाजात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्व्यक्तींचा सुद्धा सन्मान करण्यात आला. त्यात संगीता ठाकूर, प्रिया बिरारी, सोनिया सावंत यांचा समावेश होता.
यावेळी नगरसेवक राहुल कलाटे, नगरसेविका निर्मला कुटे, युवा सेनेचे विश्वजित बारणे, अनिकेत घुले, वैभव थोरात, जितेंद्र ननावरे, शर्वरी जळमकर, प्रतीक्षा घुले, उन्नति सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, संस्थापक संजय भिसे, उर्मिला काळभोर, सुलभा उबाळे, विवेक तितरमारे, सागर बिरारी, प्रिया बिरारी आदी उपस्थित होते. याप्रसंगी चिंचवड विधानसभा युवती सेनेच्या अध्यक्षा शर्वरी जळमकर यांनी जे समाजाला खऱ्या अर्थाने मार्गदर्शन व समाजामध्ये प्रबोधन करत असतात त्यांचा गुरु म्हणून सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे म्हणून युवती सेनेने हा पुरस्कार सोहळा गुरु-पौर्णिमेला केला, असे मत व्यक्त केले.