मुंबई – निर्देशांक सध्या कमी पातळीवर असल्यामुळे सकाळच्या सत्रात बरीच खरेदी झाली होती. मात्र, बाजार बंद होण्याअगोदर बॅंका आणि वित्तीय संस्थांच्या शेअरची बरीच विक्री झाल्यामुळे सलग चौथ्या दिवशी शेअर बाजार निर्देशांक घसरले.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स मंगळवारी 48 अंकांनी कमी होऊन 37,982 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 15 अंकांनी कमी होऊन 11,331 अंकावर बंद झाला. परदेशी संस्था गुंतवणूकदार विक्री करीत असल्याचे वातावरण आहे.