सायबर पोलिसांचे यश
पुणे: पुण्यातील कंपनीला 3 कोटी 41 लाख रुपये मिळवून देण्यास सायबर पोलिसांना यश आले आहे. येथील कंपनीने मेक्सिको येथील एका बॅंकेत 3 कोटी 41 लाख रुपये ई-मेलद्वारे पाठविले. ज्या ई-मेलद्वारे पाठविले. तो ई-मेल बनावट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कंपनीने तातडीने सायबर पोलिसांकडेधाव घेतली. “मॅन इन मिडल’ या “सायबर फ्रॉड’द्वारे फसवणूकीच्या प्रकारात सायबर पोलिसांनी त्वरित कारवाई केल्याने कंपनीला ही रक्कम पुन्हा मिळाली. सायबर पोलीस ठाण्याने यापूर्वी अशाच प्रकारामध्ये पुण्यातील एका नामांकित कंपनीला त्यांचे 4 कोटी 50 लाख रुपये परत मिळवून दिले होते.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, एस आर सी केमिकल कंपनीने 14 जून रोजी 1
लाख 66 हजार 276 डॉलर आणि 18 जून रोजी 3 लाख 29 हजार 40585 डॉलर एचडीएफसी
बॅंकेतून मेक्सिको येथील बॅंको मर्केटाईल टेल नॉर्टे (बेनॉटे) बॅंकेमध्ये भारतीय चलनामध्ये 3 कोटी 41 लाख रुपये पाठविले होते. ही रक्कम पाठविल्यानंतर ज्या ई मेलद्वारे रक्कम पाठविली तो ई मेल बनावट असल्याचे निदशर्नास आले. त्यामुळे रक्कमेची फसवणूक झत्तल्याचे लक्षात आल्याने कंपनीने सायबर पोलीस ठाण्यात 20 जूनला तक्रार दाखल केली होती.
ही तक्रार मिळताच सायबर पोलिसांनी तात्काळ मेस्किको येथी बॅंकेला, तक्रारदार यांचे अकाऊंट असणाऱ्या एचडीएफसी बॅंक तसेच स्वीफ्ट ट्रान्झॅक्शन जे पी मॉर्गन बॅंकेमार्फत झाल्याने त्यांना घडलेल्या घटनेबाबत आणि ही ट्रॉन्झॅक्शन फसवणुकीने झाल्याबाबत पुराव्यासहीत पत्रव्यवहार करुन त्याचा पाठपुरावा केला. या प्रयत्नांमुळे 11 जुलै रोजी फसवणूक झालेली 3 कोटी 41 लाख रुपये बॅंकेकडून एस आय सी केमिकल कंपनीला रिफंड करण्यात येणार असल्याचे पत्रव्यवहार करुन कळविले आहे