नियमांचे पालन न केल्याप्रकरणी युनियन बॅंकेवर दंडात्मक कारवाई
नवी दिल्ली : स्टेट बॅंक ऑफ इंडिया या देशातील सर्वात मोठ्या सरकारी बॅंकेला रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने मोठा झटका दिला आहे. आरबीआयने एसबीआयवर 7 कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. नॉन-परफॉर्मिंग ऍसेट आणि इतर तरतुदीसंबंधी नियमांचे पालन एसबीआयकडून करण्यात आले नाही, म्हणून आरबीआयने हा दंड ठोठावला आहे. याशिवाय, युनियन बॅंक ऑफ इंडियाला सुद्धा 10 लाख रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.
एसबीआयने आयआरएसी नियमांचे पालन केले नाही. तसेच, बॅंकेने चालू खाते उघडण्यासाठी आणि ऑपरेटिंगसाठी आचारसंहितेचे उल्लंघन केले. याशिवाय, एसबीआयवर फसवणूक आणि यासंबंधी रिपोर्टिंगच्या नियमांचे पालन केले नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. चौकशी अहवाल आणि अन्य गरजेची कागदपत्रे पाहिल्यानंतर आरबीआयकडून एसबीआयला नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर एसबीआयकडून मिळालेल्या उत्तरानंतर आरबीआयकडून दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला.