नवी दिल्ली – केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी आज मुंबई येथील इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केलं. एका वृत्तसंस्थेने माहितीनुसार केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मुंबईतील इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेबाबत प्रतिक्रिया दिली असून ते म्हणतात, “मुंबईतील इमारत कोसळल्याची घटना अत्यंत दुःखदायक आहे. या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती मी सहानभूती व्यक्त करतो तसेच या घटनेतील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो.”
या दुर्घटनेच्या बचावकार्याबाबत माहिती देताना अमित शहा म्हणाले की, “एनडीआरफचे जवान संपूर्ण ताकदीनिशी बचावकार्य करीत आहेत. राज्य सरकार, एनडीआरएफ व स्थानिक प्रशासन अपघातग्रस्तांना सेवा पुरवण्यासाठी तत्पर आहेत.”
Union Home Minister Amit Shah: #MumbaiBuildingCollapse is very tragic. My condolences with the bereaved families&prayers for early recovery of those injured. Rescue operations are in full swing. State govt, NDRF and local authorities are doing their best to assist people in need. pic.twitter.com/gBDa7HGbDh
— ANI (@ANI) July 16, 2019