मोनाको – डायमंड लीग मैदानी स्पर्धेतील महिलांमध्ये अमेरिकेच्या ऍजी विल्सन हिने 800 मीटर्स शर्यतीत विजेतेपद पटकाविले. तिला हे अंतर पार करण्यास एक मिनिट 57.73 सेकंद वेळ लागला.
दोनशे मीटर्स शर्यतीत बहामासच्या शॉनई मिलर उईबो हिने प्रथम स्थान घेतले. तिने ही शर्यत 22.09 सेकंदात पार केली. तिने विश्वविजेती खेळाडू एलेनी थॉमसन हिच्यावर मात करीत हे यश संपादन केले.