पुणे – पीएमपीच्या ताफ्यात आणखी 10 ई-बसेसची भर पडणार आहे. दि.20 जूनपर्यंत या बसेस ताफ्यात दाखल होणार आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
पीएमपीच्या ताफ्यात सध्या सुमारे 1900 बसेस आहेत. यामध्ये 25 ई-बसेस बसेसचा समावेश असून, 577 बस कंत्राटी आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपी नव्या बसेसच्या खरेदीच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे प्रवाशांचा बस प्रवास आता सुखकर होणार असून इंधन बचत, ब्रेकडाऊन कमी, फेऱ्या वाढणार आहेत. या ई-बसेस शिवाय 2019 अखेरपर्यंत एकूण उर्वरित
ई-बस, तर 440 सीएनजी बस अशा एकूण 940 बस प्रशासन खरेदी करणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत या सर्व नव्या बस ताफ्यात सहभागी करण्याचा शासनाचा मानस असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.