नवी दिल्ली – दहशतवादाच्या संबंधात चर्चा करून एक जागतिक धोरण ठरवण्यासाठी या विषयावर जागतिक परिषद आयोजित केली जावी अशी जी सुचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे त्याचे फ्रांसने स्वागत केले आहे. दहशतवादाचा मुकाबला ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे असेही फ्रांसने म्हटले आहे.
युरोप आणि फ्रांसचे विदेश व्यवहार राज्यमंत्री जीन बॅपटीस्ट लिमोयेने यांनी आज फ्रांसमधील भारतीय विद्यार्थ्यांशी बोलताना हे प्रतिपादन केले. ते म्हणाले की दहशतवादाच्या विरोधात उचलल्या जाणाऱ्या प्रत्येक पावलाचे आणि कृतीचे त्वरेने स्वागत केले पाहिजे कारण जगातील प्रत्येक देशालाच त्याचा धोका आहे. या संबंधात भारताने केलेल्या सुचनेचे आम्ही स्वागतच करतो असे त्यांनी यावेळी नमूद केले.