मुंबई: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणीच्या सुनावणीला गैरहजर राहण्यासाठी केलेला प्रज्ञासिंह ठाकूर यांचा अर्ज सोमवारी एनआयए न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर देखील आज भाजपची भोपाळ येथील खासदार प्रज्ञासिंह ठाकूरने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या सुनावणीला गैरहजेरी लावली आहे.
याबाबत न्यायालयाला माहिती देताना साध्वी प्रज्ञासिंहच्या वकिलांनी आपल्या आशिलाला उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने तसेच भोपाळ ते मुंबई असा प्रवास करण्यास असमर्थ असल्याने त्या न्यायालयामध्ये सुनावणीसाठी उपस्थित राहू शकत नाहीत असं सांगितलं.
तत्पूर्वी, सोमवारी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणीच्या सुनावणीला गैरहजर राहण्यासाठी केलेला प्रज्ञासिंह ठाकूर यांचा अर्ज सोमवारी एनआयए न्यायालयाने फेटाळून लावल्याने या आठवड्यात भाजपच्या नव्या खासदारांना आरोपी म्हणून न्यायालयात हजेरी लावणे अनिवार्य झाले होते. मात्र आजदेखील साध्वी प्रज्ञासिंहने सुनावणीला गैरहजेरी लावल्याने तिची ही या आठवड्यातील दुसरी गैरहजेरी ठरली आहे.