अर्थसंकल्पाच्या मूल्यांकनासाठी निर्देशांक

नवी दिल्ली: भारतीय उद्योग महासंघाने केंद्र आणि राज्याच्या अर्थसंकल्पाच्या मूल्यांकनासाठी यंत्रणा विकसित केली आहे. त्यामध्ये अर्थसंकल्पातील विविध तरतुदीचा अभ्यास करून त्यानुसार निर्देशांक निर्माण करण्यात आलेला आहे. यासाठी महासंघाने संयुक्‍त राष्ट्राच्या मनुष्यबळ विकास निर्देशांकाची पद्धत उपयोगात आणलेली आहे. महसूल कसा येतो. भांडवली गुंतवणुकीसाठी कसा वापर केला जातो.

कररचना कशी आहे, तूट कशा पद्धतीने नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. कर्ज व्यवस्थापन कसे आहे. या सर्व बाबीचा विचार करून हा निर्देशांक विकसित करण्यात आलेला आहे. राज्यांनी पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रांवर अधिक गुंतवणूक करणे अपेक्षित आहे, असे भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.