नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल दीड लाख किलोमीटरचा हवाई प्रवास केला. त्यांनी देशभरात 142 सभा घेतल्या, अशी माहिती भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली. तापमानाचा पारा चढा असूनही मोदींनी झंझावाती प्रचार केला, अशी स्तुतिसुमने त्यांनी उधळली.
मोदी 4 रोड शोमध्ये सहभागी झाले. सभांच्या माध्यमातून त्यांनी सुमारे दीड कोटी लोकांना थेट संबोधित केले, असेही शहा यांनी सांगितले. स्वत: शहा यांनी प्रचारासाठी 1.58 लाख किलोमीटर प्रवास केला. त्यांनी 312 लोकसभा मतदारसंघांना भेट दिली. शहांनी 161 सभा घेतल्या. त्याशिवाय, ते 18 रोड शोमध्ये सहभागी झाले.