नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यामध्ये सात राज्यांमधील 59 जागांवर आज मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्या पासून या मतदानाला जोरदार सुरुवात झाली आहे. सहाव्या टप्प्यात दिल्लीतील सर्व 7 आणि हरियाणामधील सर्व 10 जागांशिवाय उत्तरप्रदेशातील 14, बिहार, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 8-8 तर झारखंडमधील 4 जागांवर मतदान होत आहे.
BJP Candidate from East Delhi Gautam Gambhir casts his vote at a polling booth in Old Rajinder Nagar. He is up against AAP's Atishi and Congress's Arvinder Singh Lovely pic.twitter.com/uzQZdH7qzN
— ANI (@ANI) May 12, 2019
भारतीय जनता पक्षाचे पुर्व दिल्ली मतदार संघातील उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू ‘गौतम गंभीर’ यांनी देखील आज, जुन्या राजिंदर नगरमधील मतदान केंद्रात आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. गौतम गंभीर यांची लढत आम आदमी पार्टीचे अतीशी आणि काँग्रेसचे अरविंदर सिंह लवली विरोधात आहे. त्यामुळे आज या दोन्ही नेत्यांचे भविष्य आज एव्हीएम मशीन मध्ये बंद होणार आहे.