पुणे – दुष्काळाचा फटका जनावरांना अधिक बसत असून, त्या अनुषंगाने चारा छावण्यासंदर्भात अधिकाऱ्यांनी गाव-गावात पाहणी करून आढावा घ्यावा. तसेच बाधित पशुधन संख्या, लहान जनावरांसाठी खाद्याची सोय, तसेच निर्जंतुकीकरण, लसीकरण करावे लागणार असल्याने पशुपालक समितीची स्थापना करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले आहेत.
विभागातील टंचाई परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी दोन दिवसांपासून चारा छावण्या आणि विविध गावांना भेटी देऊन आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी आवश्यक त्या सूचना देऊन उपाययोजना सुचविल्या आणि तत्काळ मदत पोहोचवावी, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. अधिक माहिती देताना डॉ. म्हैसेकर म्हणाले, “पिण्याच्या पाण्याचे गावात जाणारे टॅंकर आणि टॅंकर भरण्यासाठी पाण्याचे स्रोत यांची निश्चिती करा. टॅंकरची देयके जीपीएसच्या लॉगबुक तपासूनच द्यावी.’