पिंपरी – तीन जणांच्या टोळक्यांने एका रिक्षाचालकाला दगडाने मारहाण करुन त्याच्या खिशातील पैसे काढून घेऊन लुटल्याचा प्रकार भोसरी एमआयडीसीतील इंद्रायणी कॉर्नर ते लांडेवाडी दरम्यान नुकतीच घडली. या प्रकरणी प्रशांत सोन्याबापू सरजिने (वय 36, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) असे जखमी रिक्षा चालकाचे नाव आहे.
याप्रकरणी तीन अनोळखी चोरट्यांविरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दि. 30 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास प्रशांत हे आपल्या रिक्षामध्ये प्रवासी घेऊन इंद्रायणी कॉर्नर ते लांडेवाडी दरम्यान जात होते. यावेळी अज्ञात तीन जणांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या डोक्यात दगड मारुन जखमी केले. व त्यांच्या खिशातील रोख 400 रुपये जबरदस्ती चोरुन नेले.