आकुर्डीतील सराफी दुकानावर दरोडा

पावणेतीन लाख रुपयांचे चांदीचे दागिने पळविले

पिंपरी – तवेरा कारमधून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी सराफी दुकानाचे शटर उचकटून दरोडा टाकल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे. या दुकानातील 2 लाख 78 हजार 540 रुपयांचे चांदीचे दागिने चोरुन नेले असून ही घटना शनिवारी (दि.4) रात्री पावणेदोनच्या सुमारास आकुर्डीतील अंबिका ज्वेलर्स या दुकानात घडली.

याबाबत दुकानाचे मालक अभिषेक रमेश सोलंकी (वय 34, रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी अभिषेक सोलंकी यांचे आकुर्डी येथील विठ्‌ठलवाडी परिसरात अंबिका ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. ते नेहमीप्रमाणे शनिवारी संध्याकाळी आपल्या दुकानाला कुलुप लावून घरी गेले होते. रविवारी सकाळी ते दुकान उघडण्यासाठी आले असता शटर उचकटलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आले. त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून घटणेची माहिती दिली.

यानंतर दुकान उघडले असता व दुकानातील कॅमेऱ्यांची तपासणी केली असता रात्री पावणेदोनच्या सुमारास अज्ञात चोरटे लाल रंगाची तवेरा गाडी (क्र. एमएच 12/जेयू 9380) घेवून आल्याचे दिसून आले. गाडीतील तीन चोरट्यांनी कटावणीच्या सहाय्याने दुकानाचे शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला व दुकानातील काउंटरच्या ड्रॉवर आणि रॅकमध्ये ठेवलेले एकूण 2 लाख 78 हजार 540 रुपयांचे चांदीचे दागिने चोरुन नेले. याबाबत निगडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक एल. एम. सोनवणे हे तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.