IPL 2024 (KKR vs PBKS Match 42, Playing XI) : आज आयपीएल 2024 च्या 42 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना पंजाब किंग्जशी होत आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. पंजाबचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे तर कोलकाता संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. विजयी ट्रॅकवर पुनरागमन करण्याकडे पंजाबचे लक्ष आहे. प्लेऑफच्या आशा कायम ठेवण्यासाठी आता सर्व सामने जिंकावे लागतील.
पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवनही या सामन्यात खेळत नाही. त्याच्या जागी सॅम करन नाणेफेकसाठी आला. करणने प्लेइंग-11 मध्ये बदल केला आहे. लियाम लिव्हिंगस्टोनच्या जागी जॉनी बेअरस्टोचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर कोलकातानेही प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. मिचेल स्टार्कच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्याच्या जागी दुष्मंथा चमीराचा संघात समावेश करण्यात आला आहे.
🚨 Toss Update 🚨@PunjabKingsIPL win the toss and elect to bowl against @KKRiders
Follow the Match ▶️ https://t.co/T9DxmbgIWu#TATAIPL | #KKRvPBKS pic.twitter.com/3b5VbVdr2J
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2024
KKR vs PBKS : दोन्ही संघांची प्लेइंग 11 खालीलप्रमाणे…
कोलकाता नाईट रायडर्स : फिल सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, दुष्मंथा चमीरा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.
इम्पॅक्ट सब : सुयश शर्मा, अनुकुल रॉय, मनीष पांडे, वैभव अरोरा, रहमानउल्ला गुरबाज
पंजाब किंग्ज : जॉनी बेअरस्टो, रिले रुसो, सॅम कुरन (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, हर्षल पटेल, राहुल चहर, अर्शदीप सिंग.
इम्पॅक्ट सब : प्रभसिमरन सिंग, ऋषी धवन, विद्वत कवेरप्पा, शिवम सिंग, प्रिन्स चौधरी
IPL 2024 : दुखापतीनंतर शिखर धवन मैदानात कधी परतणार? पंजाबच्या कर्णधाराबाबत मोठे अपडेट आलं समोर…
दरम्यान, हा पंजाब किंग्ज साठी ‘करा किंवा मरा’ असा सामना असू शकतो. आणखी एक पराभव पंजाबला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर काढू शकतो. पंजाबने चालू मोसमात आतापर्यंत 8 सामने खेळले असून त्यांना फक्त 2 जिंकता आले आहेत. त्याला प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर उर्वरित 6 सामने जिंकावे लागतील.
दुसरीकडे, केकेआरने 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. हा संघ 10 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. आता त्याचे आणखी 7 सामने बाकी आहेत. अशा परिस्थितीत केकेआरने यापैकी पाचही सामने जिंकले तर त्याचे प्लेऑफचे तिकीट जवळपास निश्चित होईल. त्यामुळे केकेआर त्याच इराद्याने मैदानात उतरणार आहे.
दोन्ही संघांच्या मागील सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, पंजाब किंग्जला त्यांच्या शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर केकेआरने गेल्या सामन्यात आरसीबीचा 1 धावेने पराभव केला होता.