udayanraje sharad pawar satara loksabha : सातारा लोकसभेच्या निवडणुकीतून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतली.त्यामुळे या जागेवर आता नवा पेच निंर्माण झालाय. तर दुसरीकडे महायुतीकडून देखील उदयनराजे यांच्या उमेदवारीची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. अशात उदयनराजे यांनी उमेदवारीसाठी संपर्क केल्यास त्यांच्याशी चर्चा करणार का ? असा सवाल पत्रकारांनी उपस्थित करताच शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. | udayanraje sharad pawar satara loksabha
गेल्या विधानसभा निवडणुका दरम्यान उदयनराजे यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढली. साताऱ्यात झालेल्या या पोटनिवडणुकीमध्ये श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव केला होता. त्यामुळे भाजप आणि महायुती उदयनराजेंना पुन्हा तिकीट देणार का याबाबत शंका उपस्थित केली जात होती. अशात शरद पवारांनी उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत भाष्य केलं आहे. | udayanraje sharad pawar satara loksabha
साताऱ्यात पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना शरद पवारांना उदयनराजे यांना अद्याप महायुतीने उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे त्यांनी जर तुमच्याशी संपर्क साधल्यास त्यांच्याशी बोलणार का ? असा सवाल विचारण्यात आला होता.आता तशी शक्यता नसल्याचे पवारांनी स्पष्ट सांगितले. त्यावर पत्रकार म्हणाले,मग तुम्हीही कॉलर उडविणार का ? क्षणाचाही विलंब न करता पवारांनी त्यावेळी कॉलर उडवून दाखविली. अन् पत्रकारांमध्येही एकच हशा पिकला.
सातारच्या जागेसाठी तीन चार नावे चर्चेत
शरद पवार यांनी सातारच्या लोकसभेसाठी तीन-चार नावे चर्चेत असल्याचे सांगितले. यामध्ये शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने तसेच सत्यजित पाटील यांची नावे चर्चेत असल्याचे ते म्हणाले. आम्ही यावरती चर्चा करून उमेदवार घोषित करू अशी माहिती यावेळी शरद पवार यांनी दिली. | udayanraje sharad pawar satara loksabha
काँग्रेसचं ठरलं ! वाराणसीत PM मोदींच्या विरोधात ‘हा’ नेता लढणार निवडणूक
Bank of India मध्ये क्रेडिट ऑफिसरसह विविध पदांसाठी होणार भरती ! असा करा ऑनलाईन अर्ज