पिंपरी, (प्रतिनिधी) – कै. नवलमल कुंदनमल फिरोदिया यांच्या २७ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त फोर्स मोटर्स लिमिटेड आकुर्डी येथे, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अधिकारी आणि कर्मचारी यांनी मिळून ३२२ जणांनी रक्तदान करत, नवलमल फिरोदिया यांना श्रद्धांजली अर्पण केली. आचार्य आनंदऋषीजी पुणे ब्लड बँक व वाय सी एम हॉस्पिटल ब्लड बँक यांच्या सहकार्याने हेरक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी पी व्ही इनामदार – एक्सिक्युटिव्ह डायरेक्टर यांनी नवलमल फिरोदिया यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, रक्तदान करण्याचे आव्हान केले आणि आदरांजली अर्पण केली. संजय बोहरा, राकेश मारू, प्रवीण कर्नावट, मनीष बदोनिया, पियुष श्रीवास्तव, अभय ठावरी, विनायक मोरे, उमाकांत जाधव, शिवाजी पाटील, भरत जाधव, हनुमंत पानसरे, यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने शिबिराची सुरुवात करण्यात आली.
यावेळी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी मिळून एकूण ३२२ जणांनी रक्तदान केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी विष्णु ढोल, आशा डोंगरे, अर्जुन विवेकी, तसेच भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.