Pune Political News| लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आज अनेक नेत्यांनी पक्ष प्रवेश केला आहे. दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे निकटवर्तीय सुनील माने यांचाही यात समावेश आहे.
पुण्यातील मोदी बागेत मनसेचे माजी नगरसेवक राहुल तूपेरे, माजी खासदार गिरीश बापट यांचे स्विय सहाय्यक सुनील माने, माजी नगरसेवक आरिफ बागवान, हावेलीचे माजी पंचायत समिती सदस्य सुनील खेडेकर यांच्या सह काही कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.
भाजपचे कट्टर कार्यकर्ते म्हणून सुनील माने यांना ओळखले जात होते. दिवंगत खासदार गिरीष बापट यांचे निकटवर्तीय असलेल्या माने यांना राजकारणाचा चांगलाच अनुभव आहे. शिवाजीनगर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्यास माने इच्छुक होते.
मात्र, पक्षाने त्यांना तिकीट नाकारले. याच नाराजीतून त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. आज त्यांनी काही कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षात प्रवेश केला आहे.
शरद पवार यांच्या पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी हा नेता राहुल तूपेरे, सुनील माने सारखे नेते शरद पवार गटात आल्याने पुण्यात शरद पवार यांच्या पक्षाची ताकद वाढणार आहे.