Udayanraje Bhosale । भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील वीस उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. परंतु, या यादीमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांचं नाव नसल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
भाजपने आतापर्यंत २ याद्या जाहीर केल्या या यादीतील उमेदवारांची नवे बघता असे लक्षात येते की, जुन्यांना डावलण्यात आल्याने त्यांच्यात नाराजी पसरली आहे. तर संधी मिळाल्याने अनेकांना आनंदही झाला आहे. मात्र, काही महत्त्वाच्या नेत्यांना भाजपने अजूनही वेटिंगवर ठेवले आहे. राज्यसभेतील खासदार उदयनराजे भोसले हे त्यापैकी एक. उदयनराजे भोसले यांची अद्याप उमेदवारी घोषित करण्यात आलेली नाही.
यावर आता उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,’औचित्य ठरणार नाही. तीन पक्ष एकत्र आले आहेत. सीट वाटपात पुढे मागे होईल. प्रत्येकाला वाटतं जास्त सीट मिळाव्यात आणि ते रास्त आहे. त्यात चुकीचं नाहीये. जे काही होईल त्यानंतर बघू, असं उदयनराजे भोसले म्हणाले.
Udayanraje Bhosale । माझ्याकडे तिकीट आहे उदयनराजे भोसले पुढे म्हणाले…
तुमचा पुढचा निर्णय काय असेल? असा सवाल उदयनराजे यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी काही संन्यास घेणार नाही एवढंच सांगतो. संन्यास घेणार नाही यात आलं ना सगळं, असं सांगतानाच माझ्याकडे तिकीट आहे. प्लेनचं आहे. बसचं आहे. रेल्वेचं आहे. पिक्चरचं आहे. बस आहे ना? बाकीच्यांच्या तिकीटाचं माहीत नाही. ते ठरवतील त्यावेळी बघू,
दरम्यान, उदयनराजे यांचं नाव भाजप घोषित करत नसेल तर उदयनराजेंनी स्वबळावर लढावे, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. आम्ही आजच उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर करत असल्याचं मराठा समाजानं म्हटले आहे.
यापूर्वी गुरुवारी रात्री उदयनराजे भोसले यांच्या काही समर्थकांनी भाजपच्या पदाचे राजीनामे देखील तयार केले आहेत. तिसऱ्या यादीत उदयनराजेंचं नाव उमेदवारीसाठी जाहीर न झाल्यास आम्ही राजीनामे देणार आहोत, असे उदयनराजे समर्थकांनी म्हटलं आहे. उदयनराजे यांनी स्वबळावर निवडणूक लढवावी, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असंही मराठा समाजाने यावेळी म्हटलं आहे.