Ambadas Danve on Chandrakant Khaire | ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. उद्धव ठाकरे गटाकडून छत्रपती संभाजीनगरमधून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यावरुन आता अंबादास दानवे नाराज असल्याने त्यांच्या शिंदे गटासोबत जाण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र नुकतेच दानवे यांनी शिंदे गटासोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
तसेच जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही, तोपर्यंत लोकसभेसाठी आपण आग्रही असल्याचे देखील दानवे यांनी स्पष्ट केले आहे. अंबादास दानवे म्हणाले की, “मी नाराज असल्याच्या चर्चांना काहीच अर्थ नाही. शिंदेंची शिवसेना फक्त ५ दिवसांची आहे. मी ठाकरेंसोबतच राहणार आहे. मी सर्वसामान्य शिवसैनिक आहे. माझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे अशा कोणत्याही चर्चांकडे लक्ष देऊ नये. गेल्या १० वर्षांपासून मी लोकसभेसाठी इच्छूक आहे. मी माझी इच्छा कधीच लपवून ठेवलेली नाही.” Ambadas Danve on Chandrakant Khaire|
पुढे ते म्हणाले, “मला जायचं असतं तर मी पहिल्याच दिवशी गेलो असतो. जनतेच्या काही कामांसाठी सत्ताधाऱ्यांशी आमचं फोनवर बोलनं होतं. सीट मिळणे किंवा न मिळणे याचा विचार करण्यापेक्षा संघटनेच्या विचाराने काम करणं असा माझा विचार आहे. प्रमुखांकडे काही गोष्टी मागण्याचा मला अधिकार आहे. मात्र ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल,” असेही दानवेंनी यावेळी स्पष्ट केले.
चंद्रकांत खैरेंवर दानवेंची नाराजी व्यक्त Ambadas Danve on Chandrakant Khaire|
यावेळी दानवे यांनी चंद्रकांत खैरेंवर जाहीर पणे नाराजी व्यक्त केली. “चंद्रकांत खैरे नेहमी मला डावलण्याचा प्रयत्न करतात. दोन दिवसांपूर्वी प्रचार कार्यालयाच्या स्तंभ पूजनाची देखील मला कोणतेही माहिती देण्यात आली नव्हती.”
पुढे ते म्हणाले, “मी संघटनेच्या विचारावर काम करतो. मी ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करतो. त्यामुळे मला लोकसभेची उमेदवारी मिळावी असा आग्रह धरणे यात गैर काय? मी गेल्या दोन टर्म लोकसभेसाठी आग्रही आहे. दोन्ही वेळा उमेदवारी मिळालेली नसली तरी मी पक्षाचे काम केले आहे. त्यामुळे मी पक्ष सोडून जाणार यात काही तथ्य नाही. मी कोणत्याही गटात जाणार नाही. जोपर्यंत लोकसभेचा उमेदवार जाहीर होत नाही, तोपर्यंत मी लोकसभेची उमेदवारी मिळण्याच्या स्पर्धेत असेल.”
हेही वाचा :
‘समाजाच्या शेवटच्या घटकाकडूनही गजर घडाळ्याचाच’ सुनेत्रा पवार यांची फेसबुक पोस्ट व्हायरल