Ambadas Danve| आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार आहे. काही राजकीय पक्षांनी उमेदवारी देखील जाहीर केले आहेत. एकीकडे असे चित्र असताना ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांना छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे. त्यावरून अंबादास दानवे नाराज असल्याचे म्हंटले जात आहे. त्यामुळे त्यांची शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत.
दानवे यांची मातोश्रीवर मनधरणी करण्याचा प्रयत्न Ambadas Danve|
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र दानवे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. दानवे यांची नाराजी लक्षात घेत त्यांना थेट मातोश्रीवर बोलवण्यात आले होते. तसेच तुमची प्रचारासाठी राज्यात गरज असल्याचे त्यांना सांगण्यात आले. सोबतच संजय राऊत यांच्याकडून देखील दानवे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे अंबादास दानवे नाराज असल्याचे वृत्त येत असतानाच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
संजय शिरसाट यांचे सूचक विधान Ambadas Danve|
“महाविकास आघाडीतील एक बडा नेता एक- दोन दिवसांत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार” असल्याचं संजय शिरसाट यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते. महाविकास आघाडीतील एक बडा नेता असे शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत म्हंटल्याने दानवे यांना उद्देशून असल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, एका दैनिकाला प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे म्हणाले की, ‘लोकसभा निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे. आपण अशी मागणी देखील पक्षाकडे केली आहे. यावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही. मी निष्ठावंत शिवसैनिक असून, संघर्ष हा माझ्यासाठी नवीन नसल्याने भविष्यात काय घडू शकते हे आताच सांगता येणार नाही.’
हेही वाचा:
अंबादास दानवे मोठा निर्णय घेणार? शिंदे गटात जाण्याची शक्यता; ‘या’ कारणामुळे नाराज