Praniti Shinde On BJP| आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यातच आता काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रणिती शिंदे ह्या भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत त्यांनी पुन्हा एकदा भाष्य केले आहे. ‘सोलापुरात भाजपकडून मलाच उमेदवारी दिली जाणार, ही फक्त अफवा असल्याचे,’ प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
काय म्हणाल्या प्रणिती शिंदे? Praniti Shinde On BJP|
सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून मी उमेदवार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहे. पण माझ्या रक्तातच काँग्रेस आहे. माझे वडील काँग्रेसमध्ये आहे, असे म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपला टोला लगावला आहे. “सोलापूर जिल्ह्यात विरोधी पक्षाची मी एकमेव आमदार आहे. बाकी सर्व आमदार भाजपचे आहेत. भाजपचे आमदार सत्ताधाऱ्याविरुद्ध बोलत नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या समस्या सत्याधारांसमोर मांडणार कोण?,” असा सवाल त्यांनी केला.
“सध्या हुकूमशाही सरकार असल्यामुळे आमदार घाबरत आहे. पण मी ईडीला भीत नाही. माझ्याकडे कारखाना, संस्था नाही. नशीब शिंदेसाहेब त्यात पडले नाहीत. त्यामुळे मला ईडीची कसली भीती मी दिलखुलासपणे भाजपविरुद्ध बोलणार,” असाही निर्धार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला.
दोन लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदेंचा पराभव Praniti Shinde On BJP|
काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी त्यांच्याकडून लोकसभेची तयारी केली जात असल्याची चर्चा आहे. याकरिता त्यांनी गावभेटीचा धडाका लावला आहे. मात्र, मागील दोन लोकसभा निवडणुकीत सुशिलकुमार शिंदे यांचा सलग दोन वेळेस पराभव झाला होता. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या सुशिलकुमार शिंदे यांचा 2014 मध्ये शरद बनसोडे यांनी पराभव केला. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपच्या जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्याकडून शिंदेंना पराभवाला सामोरे जावे लागले होते.
हेही वाचा: