ICC Test Ranking 2024 : आयसीसीने बुधवारी नवीनतम कसोटी क्रमवारी जाहीर केली. भारताचा (Ravichandran Ashwin) रविचंद्रन अश्विन हा जगातील नंबर वन गोलंदाज बनला आहे. धर्मशाला येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या त्याच्या 100व्या कसोटीत नऊ विकेट्स घेत त्याने एका स्थानाने प्रगती केली. त्याचवेळी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) मात्र तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्याचबरोबर भारताच्या कुलदीप यादवनेही (Kuldeep Yadav) मोठी झेप घेतली आहे.
बुमराहला मागे टाकत अश्विननं मारली बाजी…
37 वर्षीय भारतीय अनुभवी फिरकीपटूने धरमशाला येथे टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात पाच बळी घेतले. अश्विनने दोन्ही डावांसह 128 धावांत नऊ बळी घेतले होते. अश्विनने बुमराहला अव्वल स्थानावरून हटवले आहे. याआधी बुमराहही अश्विनच्या जागी नंबर वन कसोटी गोलंदाज बनला होता. अश्विनचे 870 रेटिंग गुण आहेत.
🇮🇳 🔁 🇮🇳
A new No.1 bowler has been crowned in the ICC Men’s Test Player Rankings after the #INDvENG series 🎖
— ICC (@ICC) March 13, 2024
त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड 847 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून जसप्रीत बुमराह (847 रेटिंग) तिसऱ्या स्थानावर आहे. कागिसो रबाडा (834 रेटिंग) चौथ्या आणि पॅट कमिन्स (820 रेटिंग) पाचव्या स्थानावर आहे. अव्वल 10 गोलंदाजांमध्ये भारताचा रवींद्र जडेजा (788 रेटिंग) सातव्या स्थानावर कायम आहे. त्याचबरोबर कुलदीप यादवने टॉप 20 मध्ये प्रवेश केला आहे. त्याने 15 स्थानांची झेप घेत (686 रेटिंग) 16 वे स्थान मिळवलं आहे. टॉप-20 गोलंदाजांमध्ये भारताचे चार गोलंदाज आहेत.
IPL : ‘या’ गोलंदाजाने टाकली होती आयपीएलची पहिली Super Over, आज ‘तो’ जगत आहे अज्ञाताचे जीवन….
अष्टपैलूंमध्ये जडेजा नंबर 1
कसोटी अष्टपैलूंच्या क्रमवारीत रवींद्र जडेजा 444 रेटिंगसह अव्वल स्थानावर कायम आहे. तर अश्विन 322 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशचा शाकिब अल हसन तिसऱ्या तर इंग्लंडचा रूट चौथ्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजचा जेसन होल्ड पाचव्या स्थानावर आहे. त्याचवेळी अक्षर पटेलची एका स्थानावर घसरण झाली आणि तो सहाव्या स्थानावर घसरला.