Malaika Arora । अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान एकमेकांपासून वेगळे झाले आहे मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे तर अरबाज खानने शोरा खानशी लग्न केले आहे. मलायका-अरबाजच्या घटस्फोटाला बरीच वर्षे उलटली असली तरी त्यांचे वैयक्तिक आयुष्य अजूनही चर्चेत आहे. मलायकावर अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जातात. आता एका मुलाखतीत, मलायकाने तिला कसे ट्रोल केले जाते याबाबत सांगितले आहे. घटस्फोटादरम्यान तिला अरबाजकडून मोठी पोटगी मिळाल्यामुळे ती महागडे कपडे खरेदी करते असे तिला ट्रॉल केले जाते याबाबत तिने सांगितले आहे.
मलायका अरोरा म्हणाली की, ‘एखादी व्यक्ती कठोर परिश्रम करून आपली जागा बनवते, परंतु अशा विधानांमुळे सर्व काही उद्ध्वस्त होते. मी किती महागडे कपडे घालत होते याबद्दल कोणीतरी एक लेख प्रकाशित केला यात मी महागडे कपडे घालते याचे कारणही लिहिण्यात आले होते. ते म्हणजे ‘मोठी पोटगी’ हे वाचून मी आश्चर्यचकित झाले. तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीही केले, तुम्ही कुठेही पोहोचलात, काही फरक पडत नाही. कारण शेवटी तुम्ही जे काही आहात ते तुम्हाला पोटगी मिळाल्यामुळे आहे. तुमच्या नेटवर्कला आणि महत्त्वाला किंमत नाही.’ असं म्हणत तिने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे.
दरम्यान, मलायका अरोरा आणि अरबाज खानचे लग्न जवळपास 19 वर्षे टिकले होते. 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. मलायका अरोरा हिने अरबाज खानशी लग्न केले तेव्हा ती 25 वर्षांची होती.