Celina Jaitly । ‘नो एन्ट्री’ अभिनेत्री सेलिना जेटली चित्रपटांपासून दूर असली तरी अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देते. पुन्हा एकदा तीने सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त केलं आहे. सेलिना जेटलीने हिलांबद्दल अनेक चांगल्या गोष्टी सांगितल्या. बिकिनीमध्ये स्तनपान करतानाच्या फोटोवरून तिच्यावर झालेल्या टीकेबाबतही सेलिना उघडपणे बोलली आहे.
सेलिना जेटलीने हा फोटो पोस्ट करत म्हटलं की, ‘हा तिचा सर्वात ट्रोल झालेला फोटो आहे. कारण तिने एका मुलाला आपल्या मांडीत धरले आहे पण दुसऱ्याला खाली ठेवले आहे. यासाठी तिला जज करण्यात आले, ट्रोल करण्यात आले आणि स्विमसूट परिधान केल्याबद्दल असभ्य गोष्टी बोलल्या गेल्या.’ तिने सांगितले की, ‘बिकिनीमध्ये स्तनपान केल्यामुळे माझ्याफोटोवर ‘डायन’ आणि ‘वेश्या’ अशा अपमानास्पद कमेंट करण्यात आल्या. मात्र मी एक पालक असल्याने ते क्षण कॅमेऱ्यात कैद केले.जेव्हा तुम्हाला जुळी मुले असतात तेव्हा तुम्हाला त्यांच्या गरजेनुसार त्यांच्यात बदल करावा लागतो. माझ्या मांडीवर असलेला विराज नुकताच दूध पिऊन झोपला होता आणि विन्स्टन उन्हात खेळत व्हिटॅमिन डी घेत होता.’ असं म्हणत तिने चर्चेत आलेल्या त्या फोटोवर आपलं मत मांडलं.
सेलिना म्हणाली की,’मी तेव्हा माझ्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर देऊ शकली असती पण तेव्हा मी गप्प राहिली. मी त्यावेळी फक्त नवीन आई होण्याच्या क्षणाचा आनंद घेतला.लोकांच्या बोलण्याने मी दुखावला असले तरी पण मी स्वत:ला एका योद्ध्याची मुलगी म्हणवते. त्यावेळी मला फक्त माझ्या मुलाकडे लक्ष द्यायचे होते.’