Ramkripa Ananthan| आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री यशस्वी कामगिरी करत असल्याचे पाहायला मिळते. आज अनेक महिलांनी विविध क्षेत्रात आपले नाव कमावले आहे. जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एक खास पुरुष किंवा स्त्री असते, त्याचप्रमाणे एका यशस्वी उत्पादनाचा शोध लावणारी व्यक्ती देखील एक स्त्री असू शकते. ऑटो इंडस्ट्रीमध्ये अप्रतिमरित्या काम करणाऱ्या रामकृपा अनंतन यांच्याबद्दल आज जाणून घेणार आहोत.
कोण आहेत रामकृपा अनंतन ?
रामकृपा अनंतन या एक यशस्वी ऑटोमोबाईल डिझायनर असून त्यांनी अनेक वाहनांचे डिझाइन केले आहे. रामकृपा अनंतन 26 वर्षांपासून ऑटो इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. या कारकिर्दीत त्यांनी स्कॉर्पिओ आणि एसयूव्हीपासून महिंद्रा थारपर्यंतची मॉडेल्स डिझाइन केली आहेत. महिंद्राची ही सर्व वाहने लोकांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहेत. सध्या महिंद्रा थारची सर्वात जास्त क्रेझ पाहायला मिळते. या महिंद्रा थारची रचना रामकृपा अनंतन यांनी केली आहे.
रामकृपा अनंताची सुरुवात कशी झाली?
रामकृपा अनंतने BITS पिलानी येथून मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून मास्टर्स इन डिझाईन प्रोग्रामही केले आहेत. अभ्यास पूर्ण केल्यानंतर रामकृपा अनंतनं महिंद्रा अँड महिंद्रामधून करिअरला सुरुवात केली. 1997 मध्ये त्यांना कंपनीने इंटिरियर डिझायनर पदासाठी नियुक्त केले होते.
2005 मध्ये, त्यांची महिंद्र अँड महिंद्रा येथे डिझाईन प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. या पदावर असताना त्यांनी महिंद्रा XUV500 नावाची SUV डिझाइन केली. कृपा अनंतनं 10 वर्षे डिझाईन विभागाची धुरा सांभाळली आणि नंतर त्यांना चीफ डिझायनर म्हणून बढती मिळाली. यानंतर त्याने महिंद्रा थार, XUV700 आणि स्कॉर्पिओ या तीन कारचे आयकॉनिक डिझाइन तयार केले.
या वाहनांचे केले डिझाइन
रामकृपा अनंतन त्यांच्या टीमसह बोलेरो, झायलो, महिंद्रा XUV700, स्कॉर्पिओ, महिंद्रा थार यांसारख्या कारचे डिझाइन केले आहे. या कारला लोकांची देखील मोठी पसंती मिळत आहे. एक भारतीय महिला म्हणून कारच्या लिस्टमध्ये रामकृपा अनंतनं ऑटो इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.