AUS vs NZ 1st Test (Wellington) : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टन येथे खेळवला जात आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात, कांगारू संघ 383 धावा करून सर्वबाद झाला असताना, यजमान किवी संघाची पहिल्या डावात वाईट अवस्था झाली होती आणि संपूर्ण संघ अवघ्या 179 धावांत गारद झाला.
कांगारू संघाची गोलंदाजी पहिल्या डावात चांगली होती आणि विशेषत: फिरकीपटू नॅथन लियॉन ( Nathan Lyon ) सर्वात प्रभावी दिसला. लियॉनने पहिल्या डावात 4 किवी फलंदाजांना बाद केले आणि त्याने वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज कर्टनी वॉल्श चा विक्रम मोडला. किवी संघाविरुद्धच्या पहिल्या डावात नॅथन लायनने 8.1 षटकांत 43 धावांत 4 बळी घेतले. या डावात 4 विकेट्स घेतल्यानंतर नॅथन लियॉन आता कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत एकूण सातव्या स्थानावर पोहोचला आहे आणि त्याने कोर्टनी वॉल्शला मागे टाकून आठव्या स्थानावर ढकलले आहे.
NATHAN LYON GETS HIS FOURTH WICKET 🔥
– He moves his Test tally to 521 wickets, overtook the great Courtney Walsh and becomes 7th leading wicket taker in Test history. pic.twitter.com/VeKSMmftG2
— Johns. (@CricCrazyJohns) March 1, 2024
नॅथन लियॉनच्या नावावर आता कसोटी क्रिकेटमध्ये 128 कसोटी सामन्यांमध्ये 521 विकेट्स आहेत आणि त्याने क्रिकेटच्या सर्वात प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये 519 बळी घेणाऱ्या कर्टनी वॉल्श ( Courtney Walsh ) यांना मागे टाकले आहे. वॉल्श यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत 132 सामन्यांत 519 विकेट घेतल्या. याशिवाय ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत नॅथन लायन तिसऱ्या स्थानावर आहे. कसोटीत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने 800 विकेट्स घेतल्या आहेत.
ऑस्ट्रेलियासाठी कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारे टॉप 3 गोलंदाज
शेन वॉर्न- 708 विकेट्स
ग्लेन मॅकग्रा- 563 विकेट्स
नॅथन लियॉन- 521 विकेट्स
कसोटीत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांची यादी…
1. मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) – 133 सामन्यात 800 बळी
2. शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) – 145 सामन्यात 708 बळी
3. जेम्स अँडरसन (इंग्लंड) – 186 सामन्यात 698 बळी
4. अनिल कुंबळे (भारत) – 132 सामन्यात 619 बळी
5. स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) – 167 सामन्यात 604 बळी
6. ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) – 124 सामन्यात 563 बळी
7. नॅथन लियॉन (ऑस्ट्रेलिया) – 128 सामन्यात 521 बळी
8. कर्टनी वॉल्श (वेस्ट इंडिज) – 132 सामन्यांत 519 बळी
9. रविचंद्रन अश्विन (भारत) – 99 सामन्यात 507 बळी