Gujarat Drugs । गुजरातच्या पोरबंदरच्या सागरी भागात ३३०० किलो वजनाचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने भारतीय नौदलासोबत केलेल्या कारवाईत हे अमली पदार्थ हस्तगत केले आहेत. यातील पाच आरोपी हे पाकिस्तानी असल्याची माहिती असून नाव चालवणारी व्यक्ती पाकिस्तानीच असल्याचे प्राथमिक माहितीवरून समजले आहे.
पकडण्यात आलेल्या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किमत २ हजार कोटींपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले असून सम्रद्री भागात करण्यात आलेली ही आतापर्यंत सगळ्यांत मोठी कारवाई असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. । Gujarat Drugs
जप्त करण्यात आलेल्या सामग्रीवर पाकिस्तान असे लिहिण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय नौदलाचे एक जहाज एका मोहीमे अंतर्गत दोन दिवसांपूर्वीच समुद्रात तैनात करण्यात आले होते.
संशयास्पद नावेने भारतीय हद्दीत प्रवेश केल्यावर ती रोखण्यात आली. अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यात हा अमली पदार्थांचा साठा आढळून आला. त्यानंतर त्या नावेतील पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. । Gujarat Drugs