Vijay Shekhar Sharma resigns। रिझर्व्ह बँकेकडून पेटीएम बँकेवर कारवाई केल्यानंतर आता पेटीएम पेमेंट्स बँकेसंबंधी महत्वाची माहिती समोर आलीय. बँकेचे सहसंस्थापक विजय शेखर शर्मा यांनी बिगर कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. तसेच One97 Communication Limited ने पेटीएम पेमेंट्स बँकेच्या संचालक मंडळातून आपल्या नामनिर्देशित व्यक्तीला मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विजय शेखर शर्मा यांनीदेखील बोर्ड सदस्यपदाचा राजीनामा दिला. पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडचा भविष्यातील व्यवसाय आता नव्याने स्थापन केलेल्या मंडळाद्वारे चालवला जाणार असल्याचं म्हटलं जातंय.
नवीन मंडळाची निर्मिती Vijay Shekhar Sharma resigns।
स्टॉक एक्स्चेंजकडे नियामक फायलिंगमध्ये पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्स लिमिटेडने याविषयी माहिती दिलीय. त्यात , पेटीएम पेमेंट्स बँकेने बोर्डाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन श्रीधर, सेवानिवृत्त IAS देबेंद्रनाथ सारंगी, बँक ऑफ बडोदाचे माजी कार्यकारी संचालक अशोक कुमार गर्ग आणि सेवानिवृत्त ISS रजनी सेखरी सिब्बल यांचा बोर्डात समावेश करण्यात आला आहे.
One97 Communications Limited ने नियामक फायलिंगमध्ये, त्यांच्या सहयोगी पेटीएम पेमेंट्स बँकेने नवीन संचालक मंडळ नियुक्त केले आहे. हे सदस्य नुकतेच स्वतंत्र संचालक म्हणून कंपनीत सामील झालेत येतय. ते पेटीएम पेमेंट्स बँकेच्या केवळ स्वतंत्र आणि कार्यकारी संचालक मंडळाला समर्थन देणार आहे. तसेच त्यांनी नामनिर्देशित व्यक्तीला काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय. विजय शेखर शर्मा यांनीही पेटीएम पेमेंट्स बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. पेटीएम पेमेंट्स बँक नवीन अध्यक्ष नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू करेल, असंही One97 कम्युनिकेशन्सने सांगितले.
आरबीआयच्या कारवाईमुळे अडचणी वाढल्या Vijay Shekhar Sharma resigns।
पेटीएम पेमेंट्स बँक आणि विजय शेखर शर्मा यांच्या अडचणी ३१ जानेवारी २०२४ पासून वाढल्या, जेव्हा RBI ने पेटीएम पेमेंट्स बँकेवर मोठी कारवाई केली आणि नवीन ग्राहक जोडण्यावर बंदी घातली. पेटीएमवर बँकिंग नियमनाबाबत अनियमितता केल्याचा आरोप आहे. तसेच वारंवार विनंती करूनही त्याची पूर्तता होत नव्हती. त्यामुळे आरबीआयने बँकेवर कारवाई केली.