Salman Khurshid on Congress। उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या युतीची औपचारिक घोषणा करण्यात आली. यूपीमध्ये काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढवणार , तर सपा 63 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. समाजवादी पक्षाने काँग्रेसला दिलेल्या जागांमध्ये फारुखाबादचा समावेश नाही. याबाबत माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी बंडाची भूमिका घेतलीय.
काँग्रेसकडून फारुखाबादविषयी घेण्यात आलेल्या निर्णयावर सलमान खुर्शीद यांनी पक्षविरोधी भूमिका घेतलीय. याविषयी बोलताना त्यांनी,” मो मोडेन पण झुकणार नाही,” असा स्पष्ट इशारा पक्षाच्या हायकमांडला दिलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा इशारा दिला.
मी मोडू शकतो, पण झुकणार नाही Salman Khurshid on Congress।
आपल्या पोस्टमध्ये सलमान खुर्शीद यांनी ,”फरुखाबादशी माझे नाते किती परीक्षांना सामोरे जावे लागेल? प्रश्न माझा नाही तर आपल्या सर्वांच्या भवितव्याचा आहे, येणाऱ्या पिढ्यांचा आहे. नशिबाच्या निर्णयांपुढे मी कधीही झुकलो नाही. मी मोडू शकतो, पण झुकणार नाही. तू मला साथ देण्याचे वचन दे, मी गाणी गात राहीन.” असे म्हटलंय.
माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सलमान खुर्शीद यांना ज्या फारुखाबादमधून लोकसभा निवडणूक लढवायची आहे. ती जागावाटप अंतर्गत समाजवादी पक्षाला देण्यात आल्याने हुर्शीद यांनी नाराजी व्यक्त केलीय. सपानेही या जागेवरून आपला उमेदवार उभा केला आहे. सलमान खुर्शीद यांनी फारुखाबाद मतदारसंघातून आतापर्यंत दोनदा निवडणूक जिंकली आहे. 1991 मध्ये त्यांनी पहिली निवडणूक जिंकली, तर 2009 मध्ये त्यांनी दुसरी निवडणूक जिंकली. त्यानंतर सलग दोन निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.
काँग्रेस या 17 जागांवर निवडणूक लढवणार Salman Khurshid on Congress।
लोकसभा निवडणुकीसाठी युती करताना, यूपीमधील 17 जागांवर काँग्रेस आणि उर्वरित जागांवर समाजवादी पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. काँग्रेस ज्या जागांवर लढणार आहे त्यात रायबरेली, अमेठी, कानपूर नगर, फतेहपूर सिक्री, बांसगाव, सहारनपूर, प्रयागराज, महाराजगंज, वाराणसी, अमरोहा, झाशी, बुलंदशहर, गाझियाबाद, मथुरा, सीतापूर, बाराबंकी आणि देवरिया यांचा समावेश आहे.