पिंपरी, (प्रतिनिधी) – श्री विठ्ठल तरुण मंडळ वरील आळी दापोडी येथे श्री विठ्ठल- रुक्मिणी माता मूर्ती स्थापनेचा १०० वा वर्धापन दिनानिमित्त शताब्दी कीर्तन महोत्सव २०२४ – अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून येत्या रविवारी (दि. २५) पर्यंत कीर्तन सेवा होणार आहे.
या महोत्सवानिमित्त दररोज काकडा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, महिला भजनी मंडळांची भजनसेवा तसेच २५ फेब्रुवारीपर्यंत कीर्तनसेवा व दररोज महाप्रसाद होणार आहे. तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७२७ व्या संजीवन समाधी सोहळाचे औचित्यासाधून शंभर महिला भगिनींना ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाटप आदेश सातव संदेश सातव परिवाराच्या वतीने करण्यात आले. या वेळी रावेत येथील इस्कॉन मंदिर येथील अद्वैत महाराज व सेवेकरी यांच्या हस्ते विविध रंगातील फुलांनी अभिषेक करून, पुष्पवृष्टी करण्यात आली.
या वेळी प्रथम विना पूजन करण्यात आले.या वेळी अभिजीत कंद परिवार, देहू येथील ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते. या वेळी हभप केशव महाराज मुळीक यांच्या कीर्तनाने कार्यक्रामस प्रारंभ झाला. या वेळी दापोडी, फुगेवाडी, पिंपळे गुरव, कासरवाडी, बोपोडी, खडकी या पंचक्रोशीतील भाविक बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष विजय जगताप, माजी नगरसेवक संजय काटे, बब्रुवान महाराज वाघ, माजी नगरसेवक संजय कणसे उपस्थित होते. श्री विठ्ठल रुक्मिणी तरुण मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष हभप सोपानराव भाडळे यांनी स्वागत केले.
…