bollywood news – बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या टीमने बडे मियाँ छोटे मियाँचे शूटिंग पूर्ण केले आहे. ज्याची घोषणा एका सोशल मीडिया पोस्टद्वारे करण्यात आली आहे. बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटाचा शेवट जॉर्डनमध्ये झाला. ॲक्शनने भरलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे.
View this post on Instagram
चित्रपटाच्या टीझरमध्ये हाय-ऑक्टेन ॲक्शनची झलक पाहायला मिळाली.आता या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी चित्रपटाच्या उर्वरित टीमसोबत जॉर्डनमध्ये शूटिंग पूर्ण केले. अक्षय कुमारने चित्रपटाच्या सेटवरून एक पोस्ट शेअर केली, जी सोशल मीडियावर सर्वत्र आहे. अक्षयने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो, टायगर आणि बाकीची टीने काळी माती अंगाला लावलेली दिसत आहे. या फोटो अक्षय कुमार अन् टायगर श्रॉफ अंगावर काळी माती लावत बॉडी शो करत आहे.
जॉर्डनच्या मृत समुद्राच्या काळ्या चिखलात झाकलेले हे स्टार ओळखताही येत नाहीत. हा फोटो खूप वेगाने व्हायरल होत आहे.अक्षयने या फोटोसोबत एक मजेशीर कॅप्शनही शेअर केले आहे. तो लिहितो की, ‘जुन्या मीम्सला कंटाळून, इथे काही नवीन मड-टेरिया आहे. जॉर्डनच्या मृत समुद्रात बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटाच्या या संस्मरणीय शेड्यूलचा शेवट आम्ही अशा प्रकारे साजरा केला.’
या पोस्टवर यूजर्स मजेशीर कमेंटही करताना दिसत आहे. अक्षय कुमारची ही स्टाईल प्रेक्षकांना खूप आवडली आहे. बडे मियाँ छोटे मियाँ हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.