Jaipur Pink Panthers vs Tamil Thalaivas, Pro Kabaddi League 2023-24 : प्रो कबड्डी लीग 2023-24 मध्ये, गतविजेते जयपूर पिंक पँथर्स प्रो कबड्डी लीग (PKL) च्या 10 व्या हंगामाच्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ बनला आहे. पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे बुधवारी झालेल्या हंगामातील 99व्या सामन्यात जयपूरने तमिळ थलायवाजचा 42-27 असा पराभव केला. या विजयासह जयपूर पिंक पँथर्सने गेल्या 13 सामन्यांपासून अपराजित राहण्याचा सिलसिला कायम ठेवला आहे.
12वीं जीत के साथ जयपुर के पैंथर्स ने प्ले-ऑफ के लिए किया क्वालीफाई 💪
थलाइवाज़ को हराकर पटना के फैंस को टेबल टॉपर ने कहा अलविदा 👏#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #JPPvCHE #JaipurPinkPanthers #TamilThalaivas pic.twitter.com/I842epR31X
— ProKabaddi (@ProKabaddi) January 31, 2024
जयपूर पिंक पँथर्ससाठी, ‘रेड मशीन’ अर्जुन देशवालने सुपर-10 स्कोअर करताना 13 गुण मिळवले. त्याच्याशिवाय अजित कुमारनेही नऊ गुण घेतले. तमिळ थलायवासकडून फक्त नरेंद्र कंडोला चांगला खेळ करू शकला त्याने सर्वाधिक 12 गुण मिळवले.
#PKLSeason10 (#PATvBLR Match 98) : पाटणा पायरेट्स आणि बेंगळुरू बुल्स यांच्यातील सामना बरोबरीत…
जयपूर पिंक पँथर्सचा 17 सामन्यांमधला हा 12वा विजय आहे आणि संघ आता 71 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहचला असून प्लेऑफसाठी देखील पात्र ठरला आहे. तमिळ थलायवाजला 17 सामन्यांमधला 10वा पराभव पत्करावा लागला आहे. गुणतालिकेत तमिळ थलायवाजचा संघ 40 अंकासह आठव्या स्थानावर आहे.
प्रो कबड्डी 2023 : टॉप 5 रेडर
1. अर्जुन देशवाल (जयपूर पिंक पँथर्स) : 17 सामने 191 गुण
2. आशू मलिक (दबंग दिल्ली केसी) : 16 सामने 168 गुण
3. गुमान सिंह (यू मुंबा) : 16 सामने 151 गुण
4. पवन सहरावत (तेलुगु टायटन्स) : 16 सामने 146 गुण
5. मनिंदर सिंह(मनिंदर सिंह) : 15 सामने 146 गुण
दरम्यान, या कबड्डी स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या रेडरला हंगामातील टॉप रेडरचा किताब देण्यात येईल. प्रो कबड्डी लीग 2023-24 च्या 10 व्या हंगामात 99 सामन्यानंतर सध्या जयपूर पिंक पँथर्स संघाचा अर्जुन देशवाल हा 191 रेड पॉइंट्ससह टॉप रेडर आहे. यापूर्वीच्या म्हणजेच पीकेएल सीझन 9 मध्ये जयपूर पिंक पँथर्सचा अर्जुन देशवाल हाच टॉप रेडर होता. देशवालने त्यावेळी 296 रेड पॉइंट्स मिळवले होते.