Patna Pirates vs Bengaluru Bulls, Pro Kabaddi League 2023-24 : प्रो कबड्डी लीग 2023-24 च्या 10 व्या हंगामातील पाटणा लेगच्या अंतिम दिवसाच्या पहिल्या सामन्यात, यजमान आणि तीन वेळा चॅम्पियन पटना पायरेट्सचा सामना बेंगळुरू बुल्सशी झाला, जो 29-29 च्या स्कोअरमध्ये संपला. या मोसमातील हा नववा सामना बरोबरीत सुटला आहे. पाटणासाठी खास गोष्ट म्हणजे ती घरच्या मैदानावर अजिंक्य राहिली.
या बरोबरीमुळे बेंगळुरू बुल्स आठव्या स्थानावर पोहोचला आहे. पटना 51 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पटनासाठी संदीप कुमारने 14 गुण घेतले तर बचावात अंकित जगलान याने सर्व 8 गुण घेतले. बेंगळुरू बुल्सकडून सुशीलने 8 गुण घेताना प्रभावी खेळ केला. यासह अक्षितने 6 गुण घेतले.
Men in 🟢 finish their home leg with a draw ⚔️
Pirates and Bulls had their moments, but there was no separating the two teams tonight 🤝#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #PATvBLR #PatnaPirates #BengaluruBulls pic.twitter.com/oHix8wB4W7
— ProKabaddi (@ProKabaddi) January 31, 2024
दरम्यान, प्रो कबड्डी लीग 2023-24 च्या 10 व्या हंगामात सध्या जयपूर पिंक पँथर्स संघाचा अर्जुन देशवाल हा 191 रेड पॉइंट्ससह टॉप रेडर आहे. यापूर्वीच्या म्हणजेच पीकेएल सीझन 9 मध्ये जयपूर पिंक पँथर्सचा अर्जुन देशवाल हाच टॉप रेडर होता. देशवालने त्यावेळी 296 रेड पॉइंट्स मिळवले होते.