India Vs England 1st Test in Hyderabad Day 2 : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या हैदराबाद कसोटीचा दुसरा दिवस आज सुरू आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लिश संघाने पहिल्या डावात 246 धावा केल्या. गुरुवारी पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने एका विकेटवर 119 धावा केल्या होत्या आणि आज संघ त्यापुढे खेळत आहे.
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताच्या 90 षटकात 6 बाद 357 धावा झालेल्या आहेत. सध्या क्रीजवर रविंद्र जडेजा 60*(99) आणि रविचंद्रन अश्विन 01*(09) धावांवर खेळत आहेत. सध्या भारताची आघाडी 111 धावांची झालेली आहे.
IND vs ENG Live: भारताला सहावा धक्का..
भारताला 356 धावांवर सहावा धक्का बसला. या सामन्यात जो रूटने दुसरे यश मिळवले. त्याने केएस भरतला एलबीडब्ल्यू आऊट केले. भरतला 41 धावा करता आल्या. सध्या रवींद्र जडेजा आणि अश्विन क्रीजवर आहेत. जडेजाने अर्धशतक झळकावले आहे. भारताची आघाडी 110 धावांपेक्षा जास्त झाली आहे.
IND vs ENG Live: जडेजाचे अर्धशतक…
रवींद्र जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 20 वे अर्धशतक झळकावले. त्याने तलवारबाजी शैलीत आनंदोत्सव साजरा केला.
Watch out for that trademark sword celebration 😎
Ravindra Jadeja at his best 🙌
Follow the match ▶️ https://t.co/HGTxXf7Dc6#TeamIndia | #INDvENG | @imjadeja | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/2WJbTYPL1x
— BCCI (@BCCI) January 26, 2024
IND vs ENG Live : केएल राहुल बाद, शतक हुकलं…
291 धावांवर भारताला पाचवा धक्का बसला. केएल राहुल 86 धावा करून बाद झाला. त्याला हार्टलेनं रेहानच्या हाती झेलबाद केले. त्यापूर्वी उपाहारानंतर भारताला पहिला आणि एकूण चौथा धक्का श्रेयस अय्यरच्या रूपाने बसला. टीम इंडियाला 223 धावांवर चौथा धक्का बसला. श्रेयस अय्यर 35 धावा करून बाद झाला. हार्टलेच्या हातून त्याला रेहान अहमदने झेलबाद केले. श्रेयसने राहुलसोबत 64 धावांची भागीदारी केली.
दरम्यान, त्यापूर्वी भारताने आज एका विकेटवर 119 धावांवर पुढे खेळण्यास सुरुवात केली. दिवसाच्या पहिल्याच षटकात रूटने यशस्वी जैस्वालला बाद केले. त्याने यशस्वीला त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. यशस्वीचे शतक हुकले आणि तो 80 धावा करून बाद झाला. त्याचवेळी आजचा दुसरा धक्का शुभमन गिलच्या रूपाने बसला. त्याला टॉम हार्टलीने बेन डकेटच्या हाती झेलबाद केले. त्याला 23 धावा करता आल्या.