बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा लेक अनेकदा चर्चेत असतात. सध्या अरहान खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याचे नाव रवीना टंडनच्या मुलीसोबत जोडले जात आहे. दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकत्र स्पॉट होत आहे. ज्यानंतर राशा आणि अरहान एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहे. हे दोघेही अनेकवेळा पापाराझी कॅमेऱ्यात एकत्र दिसले आहे.
View this post on Instagram
नुकतेच दोघेही पुन्हा एकत्र दिसले. यानंतर राशा थडानी आणि अरहान खानच्या डेटींगच्या चर्चांना वेग आला आहे. त्याचा लेटेस्ट व्हिडिओ व्हायरल होत आहे. राशा अरहान नुकतेच मुंबईतील वांद्रे भागात स्पॉट झाले होते. पापाराझींनी दोघांना एकत्र पाहताच त्यांचे फोटो क्लिक करायला सुरुवात केली. त्यानंतर ते दोघे एकाच गाडीत बसले आणि एकमेकांशी बोलत असताना तेथून निघून गेले. दोन्ही स्टार किड्स एकदम मस्त दिसत होते.
राशाने फिकट पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता, तर अरहानने पांढऱ्या टी-शर्टसह काळी हॅरेम पँट घातली होती. राशा अरहान खानचे नवीन फोटो व्हायरल होत आहे. दोन्ही स्टार किड्स एकत्र पाहिल्यावर अनेक कमेंट्स येत आहे. व्हायरल व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘दोघेही नक्कीच रिलेशनशिपमध्ये आहेत. एका यूजरने लिहिले की, अरबाजनंतर आता तोही लग्न करणार आहे. एका यूजरने लिहिले की, ‘या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी सुरू आहे. असं म्हणत आता त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरु आहे.