भुवनेश्वर – अल्टिमेट खो-खो स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात चेन्नई क्विक गन्स व ओडिशा जगरनॉट्स हा सामना ३०-३० असा बरोबरीत सुटला. हा सामना अल्टीमेट खो-खोच्या सीझन दोन मध्ये कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर झाला. आजच्या सामन्यामध्ये रामजी कश्यपला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
Full time, and the battlefield remains leveled. Another epic showdown, another thrilling draw. The competition is fierce, and victory elusive.🔥#chennaiquickguns #comeonisay pic.twitter.com/uJenLqMCse
— Chennai Quick Guns (@ChnQuickGuns) January 2, 2024
या सामन्यात चेन्नई क्विक गन्स व ओडिशा जगरनॉट्सचा सामना ३०-३० (मध्यंतर १५-१३) असा बरोबरीत राहिला. चेन्नई क्विक गन्सला मध्यंतराला मिळालेल्या २ गुणांची आघाडी उपयोगी ठरली नाही. ओडिशा जगरनॉट्सने नाणेफेक जिंकून प्रथम आक्रमण घेतले व चेन्नई क्विक गन्सला संरक्षणासाठी आमंत्रित केले. पहिल्या टर्नमध्ये चेन्नई क्विक गन्सच्या पहिल्या तुकडीने संरक्षण करताना ३.३४ मि.ची वेळ दिली. या तुकडीतील आदर्श मोहितेला आकाशीय सूर मारत मनोज पाटीलने बाद केले, सुमन बर्मन (१.०७ मि. संरक्षण) व लक्ष्मण गवसने १.२५ मि. संरक्षण करताना २ ड्रीम रन्सचे गुण मिळवून दिले त्याला महेशा पी.ने सहज स्पर्शाने बाद केले. तर दुसऱ्या तुकडीतील विजय शिंदे व मदनाला दिलीप खान्दाविणे बाद केल मात्र रामजी कश्यप शेवटपर्यंत नाबाद राहत ड्रीम रन्सचा १ गुण मिळवून दिला. या टर्न मध्ये ओडिशा जगरनॉट्सने १० तर चेन्नई क्विक गन्सने ३ असे गुण नोंदवले.
दुसऱ्या टर्न मध्ये ओडिशा जगरनॉट्सची पहिली तुकडी २.०६ मिनिटात बाद झाली. दिलीप खांडवीला आकाशीय सूर मारत सचिन भार्गवने बाद केले. तर रामजी कश्यपने आकाशीय सूर मारत गौतम एम के ला घराचा रस्ता दाखवला. नंतर विशालला सुरज लांडेने आकाशीय सूर मारत बाद केल. दुसऱ्या तुकडीतील ओंकार सोनवणेला पुन्हा एकदा सुरज लांडेने आकाशीय सूर मारत बाद केल. त्यच्या पाठोपाठ दिपेश मोरेला (१.११ मि. संरक्षण) लक्ष्मण गवसने असाज स्पर्शाने बाद केले तर बी निखीलने (१.१५ मि. संरक्षण) ३ ड्रीम रन्सचे गुण मिळवून दिले, त्याला आदित्य कुदळेने सहज स्पर्शाने बाद केले.
मध्यंतरानंतर तिसऱ्या टर्न मध्ये चेन्नई क्विक गन्सची पहिली तुकडी जवळजवळ २.२० मि. बाद झाली त्यात सचिन भार्गव व सुरज लांडे लवकर बाद झाले त्यांना अनुक्रमे आकाश मंडल व पी. महेशाने बाद केल. त्यानंतर आदित्य कुदळेला आकाशीय सूर मारत मनोज पाटीलने डीआरएस घेत बाद केले. दुसरी तुकडी साडेतीन मिनिटात दोन्ही तुकड्या बाद झाल्या त्यानंतर आलेल्या मदनाला रोहन शिंगाडेने लगेचच बाद केले. विजय शिंदेला बी. निखिलने बाद केल. त्यानंतर रामजी कश्यपने अतिशय उत्कृष्ट संरक्षणाची खेळी करत एक ड्रीम रन्स मिळवत चेन्नई क्विक गन्सला १६ गुणांवर आणून ठेवले. त्यात एकदा डीआरएस घेत रामजीने स्वत:ला नाबाद असल्याचे दाखवत शेवटपर्यंत नाबादच राहिला.
रामजीने विशालला बाद केले व सामना फिरला
शेवटच्या व चौथ्या टर्न मध्ये ओडिशा जगरनॉट्सची पहिली तुकडी मैदानात उतरल्यावर दीपक साहुला विजय शिंदेने एक मिनिटात बाद केले व अडीच मिनिटात पहिली तुकडी बाद करत चेन्नई क्विक गन्सने विजयाकडे घोडदौड सुरु केली. या तुकडीतील अक्षय मासाळ व मनोज पाटील लवकर बाद झाले. त्यांना अनुक्राने आकाश कदम व सुरज लांडेने अनुक्रमे स्तंभात व आकाशीय सूर मारत बाद केले. त्यानंतर पी. महेशाला आदर्श मोहितेने बाद केले तर अविनाश देसाईला दुर्वेश संळूखेने स्तंभात बाद केले तर रोहन शिंगाडेने एक ड्रीम रन मिळवून देत सचिन भार्गव कडून बाद झाला व हाच गुण त्यांना पराभवापासून वाचवण्यास कारणीभूत ठरला. तर शेवटच्या क्षणाला रामजी कश्यपने विशालला बाद करून ही लढत बरोबरीत सोडवली. या सामन्यात पी. महेशा उत्कृष्ट आक्रमक, रामजी कश्यपला उत्कृष्ट संरक्षक तर रोहन शिंगाडेला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.