पुणे – महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी बुधवारपासून (दि. २७ डिसें.) सुरू होत आहे. महाअंतिम फेरीत राज्यातील १९ संघांचा सहभाग असून, पुण्यातील टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या ‘पिक्सल्स’ एकांकिकेने स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेसाठी मंगळवारी (दि. २६) सायंकाळी लॉटस् काढण्यात आले.
दि. २७ आणि दि. २८ रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळात तर दि. २९ रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक, अशा पाच सत्रात स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. २९ रोजी सायंकाळी पाच वाजता सूर्यकांत कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे.
- १९ संघांचे होणार सादरीकरण
- २९ डिसेंबरला पारितोषिक वितरण