स्मार्टफोनकडून नक्की काय हवं आहे ?

विनफोन आता अँड्रॉइडशी स्पर्धा करण्याच्या तयारीत

स्मार्टफोनकडून नक्की काय हवं आहे हे माहीत असल्यास आपण ‘स्मार्ट’ निर्णय घेऊ शकाल. ड्युअल सिम की ड्युअल सिम अधिक मेमरी कार्ड, बॅटरी लाइफ, ड्युअल कोअर, क्वाड कोअर, रॅम, स्क्रीन साइझ, किती पिक्सेलचे कॅमेरे… या अनेक बाबींमधल्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीपासून आपण सुरूवात करू, ती म्हणजे ओएस. स्मार्टफोनची सगळी ‘हुषारी’ अवलंबून असते त्यामधल्या ऑपरेटिंग सिस्टिमवर. आपल्याकडे अँड्रॉइड (गूगल), आयओएस (अ‍ॅपल) आणि विंडोज या पर्यायांमधून निवड करता येते.

बाजारपेठेतला अँड्रॉइडचा वाटा खूपच मोठा आहे आणि ‘गुगल अ‍ॅप्स’ही अतिशय उपयुक्त आहेत हे खरं असलं तरी ‘विनफोन’चेही बरेच फायदे आहेत, विशेषतः त्याच्या हार्डवेअरच्या संदर्भात. म्युझिक आणि इतरही बर्‍याच गोष्टींमध्ये विनफोन आता अँड्रॉइडशी स्पर्धा करण्याच्या तयारीत आहे. ‘डिजिटल क्वालिटी’मध्ये अ‍ॅपलसमोर उभं राहू शकणारं कोणी नाही हे जगजाहीर असल्याने इथे जास्त लिहिण्याची गरज नाही. अँड्रॉइड ओएसची नावं इंग्रजी आद्याक्षरांप्रमाणे लावलेली असल्याने ओएसच्या नावाच्या आद्याक्षरावरून ती किती ताजी आहेत हे कळतं. ओएसनंतरची महत्त्वाची बाब म्हणजे प्रोसेसरचा दर्जा आणि कार्यक्षमता. अर्थात प्रोसेसरचा वापर कशा प्रकारे करायचा हे बरेचसं ओएसच्या हातात असतं. त्यामुळे कदाचित आयफोनमधला ड्युअल कोअर प्रोसेसर अँड्रॉइडमधल्या क्वाड कोअरपेक्षा जास्त चांगली कामगिरी करत राहिला.

आता स्मार्टफोनच्या दृश्य भागाकडे म्हणजेच डिस्प्ले उर्फ स्क्रीनकडे पाहू. स्क्रीनवरची प्रतिमा, हॅँडसेट फिरवून, विविध कोनांमधून पहावी. शिवाय कमी-जास्त उजेडातसुद्धा. साध्या स्मार्टफोन्ससाठी 720 पिक्सेलपर्यंतचे एचडी स्क्रीन चांगले मानले जातात. एखादे वेब-पेज लोड करून वाचून पहा, डोळ्यांना त्रास झाला नाही तर स्क्रीन ठीक आहे. मात्र 800 * 400 पीपीआयपेक्षा कमी क्षमतेच्या स्क्रीनचा स्मार्टफोन घेणे शक्यतो टाळा.

साधारण 3.5 – 5 इंच आकारातले फोन चांगले. जास्त आकाराचा हॅँडसेट एका हाताने वापरणं अवघड असतंच शिवाय तो जडही असतो आणि कोणत्याच खिशात नीट मावत नाही. जास्त एमपी (मेगापिक्सेल) चा कॅमेरा म्हणजे जास्त चांगला फोटो या गणिताला फारसा अर्थ नाही. कॅमेर्‍याच्या लेन्सचा दर्जा महत्त्वाचा. शिवाय हे फोटो आपण फक्त सोशल नेटवर्कवर शेअरच करणार असाल तर 5 एमपी कॅमेरा पुरेसा आहे. फ्लॅश मात्र एलइडी हवा.

रॅम आणि स्टोअरेज जितके जास्त तितके चांगले. हॅँडसेटची साठवण-क्षमता मायक्रो एसडी कार्ड टाकून वाढवता येत असली तरी फोनच्या मूळ क्षमतेतला निदान 20-25 टक्के भाग ओएस स्वतःच वापरते हे लक्षात ठेवा. म्हणजेच 32 जीबी क्षमतेचा फोन असला तरी त्यातले आठ जीबीच प्रत्यक्ष उपयोगी पडतात. आता शेवटचे म्हणजे बॅटरी. वर लिहिलेल्या सगळ्या गोष्टी चालवताना बॅटरी फटाफट संपते. तेव्हा किमान तीन ते चार हजार एमएएच ताकदीची बॅटरी असलेला हॅँडसेट निवडा. तसंच लिथिअम-पॉलिमर बॅटरी लिथिअम-आयर्न बॅटरीपेक्षा हलकी आणि दीर्घायुषी असते. शिवाय अलिकडच्या हॅँडसेटची बॅटरी बदलता येत नाही हेदेखील लक्षात ठेवा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.