Jammu Kashmir Terrorist Attack: दहशतवाद्यांनी गुरुवारी (21 डिसेंबर) जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या या गोळीबारात तीन जवान शहीद झाले आहेत.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, राजौरी-थानमंडी-सुरनकोट मार्गावरील सावनी भागात लष्कराच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. हे वाहन बुफलियाज येथून सैनिकांना घेऊन जात होते. बुफलियाजमध्ये बुधवारपासून (20 डिसेंबर) दहशतवाद्यांविरोधात घेराव आणि शोध मोहीम सुरू आहे.
STORY | Terrorists fire at Army vehicle in Poonch in Jammu and Kashmir
READ | https://t.co/n7rX6uV5H9
WATCH: Visuals from the site where an Army vehicle was ambushed by terrorists earlier today. pic.twitter.com/6eCAMeiXFU
— Press Trust of India (@PTI_News) December 21, 2023
लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, परिसरात चकमक सुरू आहे. अतिरिक्त सैनिक घटनास्थळी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.