नवी दिल्ली – पंजाबचे कॅबिनेट मंत्री अमन अरोरा यांच्यासह नऊ जणांना सुनम न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा नियोजन मंडळाचे माजी अध्यक्ष राजिंदरसिंग राजा यांचाही शिक्षा झालेल्यांमध्ये समावेश आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे.
मंत्री अमन अरोरा यांचे मेहुणे राजिंदर दीपा यांनी १५ वर्षांपूर्वी २००८ मध्ये न्यायालयात तक्रार दाखल केली होती. अमन अरोरा आणि त्याच्या साथीदारांनी तिच्या घरात घुसून हल्ला केल्याचा आरोप दीपाने तक्रारीत केला होता. त्यावेळी अमन अरोरा आणि राजिंदर दीपा दोघेही काँग्रेसमध्ये होते. दोघांमधील राजकीय भांडण शिगेला पोहोचले होते.
सुनममध्ये दोन्ही नेत्यांची घरे एकमेकांच्या विरुद्ध आहेत. आता दोन्ही नेत्यांनी काँग्रेस सोडली आहे. सध्या अमन अरोरा हे आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री आहेत तर राजिंदर दीपा अकाली दलाचे सरचिटणीस आहेत.
आम आदमी पक्षाची देशभर एक आगळीवेगळी प्रतिमा आहे. पंजाबमध्ये देखील आपचेच सरकार आहे. आसात त्यांच्याच मंत्र्याला शिक्षा झाल्याने पक्षस्रेष्ठी अरविंद केजरीवाल तसेच पंजाबचे मुख्यमंत्री अरोरा यांच्याबाबत काय निर्णय घेणार याबाबत सर्वांच लक्ष लागलं आहे.