IFFI – महोत्सवाचा समारोपाचा चित्रपट म्हणून आज गोव्यात 54 व्या इफ्फीमध्ये ‘द फेदरवेट’ (The Featherweight) या अमेरिकन चित्रपटाचा आशिया प्रीमियर झाला. माध्यमांशी संवाद साधताना, चित्रपट निर्माते रॉबर्ट कोलोनी यांनी सांगितले की हा चित्रपट इटालियन-अमेरिकन बॉक्सर विली पेप याच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे ज्याचा बॉक्सिंगमध्ये सर्वाधिक लढतींचा विक्रम आहे. त्याचा कारकिर्दीत 241 फाईट्सचा विक्रम आहे. (Film Festival)
“दिवंगत बॉक्सरच्या (Boxer story) गावी चित्रपटाचे चित्रीकरण करण्यापासून ते त्यांचे बॉक्सिंग ग्लोव्हज वापरण्यापर्यंत, हा चित्रपट सत्य आणि काल्पनिकता, वास्तव आणि सिनेमा यांच्यातील दोलायमानता आहे” असे दिग्दर्शकाने स्पष्ट केले. (Goa film festival)
विली पेप यांचा गतिमान जीवनाचा इतिहास, क्रीडा नाट्यातील उत्सुकता आणि मानवी नाट्याचे वास्तव यामुळे माहितीपूर्ण, मनोरंजक आणि वास्तव कथा सादर करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. “आंतरराष्ट्रीय मंचावर चित्रपटाद्वारे संवाद साधणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे”, असे कोलोनी यांनी यावेळी नमूद केले.
१९६० च्या दशकाची पार्शवभूमी असलेला चित्रपट…
१९६० च्या दशकाच्या मध्यावधीची पार्श्वभूमी असलेला द फेदरवेट हा चित्रपट इटालियन-अमेरिकन बॉक्सर विली पेप यांच्या खर्या-आयुष्यातील मनोरंजक अध्याय सादर करतो- ज्यांच्या नावावर सर्वाधिक लढतींचा विक्रम आहे ; वयाच्या चाळीशीत वैयक्तिक आयुष्यात खचलेले असताना ते रिंगमध्ये परतण्याचा निर्णय घेतात. त्याचवेळी एक माहितीपटाचा चमू त्यांच्या आयुष्यात येतो. विसाव्या शतकात अमेरिकन पुरुषत्व, प्रसिद्धी आणि आत्म-धारणा यांच्या असंतोषाचे चित्रण या चित्रपटात आहे.