मंचर – आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील तपनेश्वर मंदिर येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला.
तपनेश्वर मंदिर या ठिकाणी बाबा अमरनाथ सेवा संघ व भोले भक्त परिवार यांच्या माध्यमातून हजारो पणत्या लावून, आकर्षक रांगोळी काढून फुलांची सजावट करण्यात आली होती.
तसेच तुळशी विवाह करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे नेते संजय थोरात हे उपस्थित होते. त्यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या तसेच आयोजकांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ मंचरचे अध्यक्ष प्रशांत बागल, पिंटूशेठ थोरात, संजय बाणखेले, नवनाथ थोरात, नितीन थोरात, संजय चिंचपुरे, विकास बाणखेले, आयोजक सुरेश घुले, प्रकाश थोरात, विशाल मोरडे, विनोद हुले, सुशांत जाधव, एकनाथ मुळे व बाबा अमरनाथ सेवा समितीचे सभासद, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.