सागर येवले
पुणे -सायकलींचे शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्याने मागील काही वर्षात दुचाकींचे शहर अशी ओळख बनवली आहे. यावर्षी अवघ्या सहा महिन्यात तब्बल पावणेदोन लाख वाहनांची खरेदी झाली असून, यंदा मागील पाच वर्षांतील उच्चांकी खरेदी होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या आहे.
पुणे शहरात सध्या जवळपास 37 लाख वाहने आहेत. प्रत्येक वर्षी दोन ते अडीच लाख वाहनांची भर पडत आहे. त्यात पुण्यात सर्वाधिक दुचाकींची संख्या आहे. त्यामुळे रस्ते कमी आणि वाहने जास्त अशी परिस्थिती झाल्यामुळे वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या वाढत आहे.
मागील पाच वर्षांतील वाहन खरेदीची माहिती
वर्ष वाहन खरेदी
2018-192,61,410
2019-202,47,225
2020-211,43,958
2021-221,68,576
2022-232,73,849
2023-241,40,856 (सप्टेंबरपर्यंत)
- एप्रिल 2018 ते सप्टेंबर 2023 दरम्यान महत्त्वाची वाहन खरेदी
- दुचाकी खरेदी संख्या – 7 लाख 94 हजार 280
- चारचाकी खरेदी करणाऱ्यांची संख्या- 2 लाख 92 हजार 522
- तीनचाकी खरेदी करणाऱ्यांची संख्या- 49 हजार 646
- प्रवासी वाहतूक चारचाकी वाहन खरेदी – 20 हजार 431