Virat Kohli In World Cup Knockouts : विश्वचषक 2023 च्या साखळी टप्प्यातील सर्व 9 सामने जिंकणारा भारतीय संघ बुधवारी, 15 ऑक्टोबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. न्यूझीलंडविरुद्धचा विश्वचषक उपांत्य सामना आधीच भयावह होता पण आता विराट कोहलीच्या विश्वचषकातील (नॉकआउट) बाद फेरीतील आकड्यांमुळे आणखी टेन्शंन वाढलं आहे.
विराट कोहलीने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत एकूण 6 नॉकआउट सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 4 वेळा दुहेरी आकडा देखील ओलांडला नाही. कोहलीची 6 डावांमध्ये सर्वाधिक धावसंख्या 35 धावा आहे, जी त्याने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकातील श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात केली होती.
दोन बाद फेरीत कोहली 1-1 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. अशा परिस्थितीत 2023 च्या विश्वचषकातील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत विराट कोहलीची कामगिरी कशी असेल हे पाहणे रंजक ठरेल.
एकदिवसीय विश्वचषकाच्या नॉकआउट सामन्यात कोहलीची कामगिरी (एकूण 6 डाव)
24 धावा- विरुद्ध ऑस्ट्रेलिया, क्वार्टर फाइनल, 2011
09 धावा- विरुद्ध पाकिस्तान, सेमीफाइनल, 2011
35 धावा- विरुद्ध श्रीलंका, फाइनल, 2011
03 धावा- विरुद्ध बांग्लादेश, क्वार्टर फाइनल, 2015
01 धावा- विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सेमीफाइनल, 2015
01 धावा- विरुद्ध न्यूझीलंड, सेमीफाइनल, 2019.
स्पर्धेतील साखळी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा…
विश्वचषक 2023 च्या साखळी सामने संपल्यानंतर कोहली सर्वाधिक धावा करणारा खेळाडू राहिला. त्याने 9 सामन्यांच्या 9 डावात 99 च्या उत्कृष्ट सरासरीने 594 धावा केल्या. या काळात त्याने 2 शतके आणि 5 अर्धशतके झळकावली. या दरम्यान, कोहलीने 55 चौकार आणि 7 षटकार मारले.